You are currently viewing टोल चे मोल हवे कशाला?

टोल चे मोल हवे कशाला?

टोल चे मोल हवे कशाला?

मुंबई गोवा महा रस्ता
किती खाणार खस्ता
महिने झाले, वर्षे झाली
अजून आहे अपूर्ण रस्ता

करून झाली आंदोलने
मांडून झाले गाऱ्हाणे
सुधारणेचे नाव नाही
नेहमी पदरी वाटाणे

माणसं आम्ही साधीभोळी
सोसती रोज हाल निमूट
उरफाटे सरकार टाकतेय
जखमेवर मीठाची चिमूट

टोलचे मोल हवे कशाला ?
बिन कामाचा मोबदला
अहो द्यायचा फुका कशाला
लाज शरम हवी वाटायला

आमच्याच कडून घ्यायचे अन्
खिशातून दिल्याचे दाखवायचे
डावपेच असे चालणार नाहीत
देणारच नाही हे निक्षून सांगायचे
संग्रह अजित नाडकर्णी,संवाद मीडिया

प्रतिक्रिया व्यक्त करा