*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहा मिळणार आयुष्यभर*
पहात होती जरी एकटक
नाही पाहिले *मी ढुंकून*
हात भजता पडला कप
डोळ्यात पाहिले मी वाकून
1
ग्लास सोडून पहात होती
हात आईचा *ती मांजर*
येता मनात काही करमेना
सरळ गाठले तिचे *शहर*
2
ठरवून आलो लग्न तिच्याशी
चहा पीतो मी तिचे हातचा
नसली जरी साखर पुरेशी
चहा पितो मी चमचा चमचा
3
शिकली जरी ती मराठीतून
“गुडमॉर्निंगने” होते सकाळ
फक्कड बनवते असा चहा
प्यायला येतो रोजच काळ
4
तोही झाला फिदा चवीवर
घेऊन गेला तिचा *नंबर*
देऊन आशीष चिरंजीवभव
चहा मिळणार आयुष्यभर
5
विनायक जोशी 🖋️ठाणे
मोबाईल/9324324157
