You are currently viewing चित्रकाव्य

चित्रकाव्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चित्रकाव्य*

 

किती खेळ खेळून झाले

किती डाव हारून झाले

जिंकण्याच्या मोहात

किती स्वप्ने जळून खाक झाले

 

सुखासुखी जगणे

सारेकाही सरून गेले

एक घडीच्या डावापायी

सर्वच काही हरवून गेले

 

डाव मांडले आयुष्यचे

सोंगट्यांनी रंग भरले

कोण आपले कोण परके

खेळ संपल्यावर कळून आले

 

हारलो किती डाव सारे

जिंकून त्यांनीच नेले

झोळी झाली रिकामी नी्

गाव सोडून गेले

 

नको हे वळण वेगळे

सज्जन नसतात सगळे

खऱ्याला डावावर लावणारे

अवतीभवती असतात किती बगळे

 

अरे खेळ संपतो डाव संपतो

पण आपलं कोणी रहात नाही

गेलं जे परत मिळालं तरी

व्रण जखमांवचे जात नाही

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा