You are currently viewing श्री देव मानसीश्वर जत्रौत्सवानिमित्त उभादांडा नवाबाग शाळेच्या स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकाचा “खरी कमाई उपक्रम”

श्री देव मानसीश्वर जत्रौत्सवानिमित्त उभादांडा नवाबाग शाळेच्या स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकाचा “खरी कमाई उपक्रम”

वेंगुर्ला :

श्री देव मानसीश्वर जत्रेच्या निमित्ताने जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबाग,ता.वेंगुर्ला शाळेच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाईचा आनंद मिळविला. सकाळी लवकरच पूजा साहित्य विक्रीला सुरूवात करण्यात आली. भाविकांनी मुलांकडील साहित्य खरेदीस प्राधान्य दिले.

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्राजक्ता आपटे, कब मास्टर श्री.रामा पोळजी, शिक्षक श्री.मारुती गुडुळकर यांनी परीश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दादा केळुसकर, उपाध्यक्ष श्री.दत्ताराम कोळंबकर, सदस्य देवेंद्र तांडेल, शिवानंद आरावंदेकर, सुभाष तांडेल, सौ.लक्षिका केळुसकर व इतर पालकांचे सहकार्य लाभले.

सदर उपक्रमास उभादांडा कार्यबल गटाचे केंद्रप्रमुख श्री.अडुळकर सर, माजी जि.प.सदस्य मा. श्री.दादा कुबल, डाॅ.वसुधा मोरे मॅडम बर्‍याचश्या शिक्षकांनी, विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुकही केले.

कब-बुलबुल व स्काऊट-गाईडच्या पथकामध्ये तन्मय मोर्जे, तनिष गिरप, मैथिली केळुसकर, रामकृष्ण कुबल, रामचंद्र तांडेल, निरज मोर्जे, गाथा कोळंबकर, धीरज मोर्जे, विरेन तांडेल, चिन्मई मोर्जे, ओंकार केळुसकर, लावंण्या गोकरणकर, वेदांत केळुसकर, मनिष मोटे आदीनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =