अजित कानशिडे सचिव तर विजय चौकेकर जिल्हा संघटक; विविध स्तरातून अभिनंदन
कुडाळ :
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ॲड. राजीव बिले यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी अजित कानशिडे व जिल्हा संघटकपदी विजय चौकेकर यांची निवड जाहीर करण्यात आली.
ही निवड राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर तसेच राज्य संघटक हरीशभाऊ पाथोडे यांनी केली आहे. दि. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून जिल्हा कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांची निवड नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले, सचिव अजित कानशिडे व जिल्हा संघटक विजय चौकेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
