You are currently viewing “अधिकारी बनण्याचं स्वप्न आता रीलमधून जगासमोर!” ; महेंद्रा अकॅडमीची ‘रील स्पर्धा २०२६’ जाहीर

“अधिकारी बनण्याचं स्वप्न आता रीलमधून जगासमोर!” ; महेंद्रा अकॅडमीची ‘रील स्पर्धा २०२६’ जाहीर

“अधिकारी बनण्याचं स्वप्न आता रीलमधून जगासमोर!” ; महेंद्रा अकॅडमीची ‘रील स्पर्धा २०२६’ जाहीर

प्रथम पारितोषिक १० हजार रुपये; स्पर्धा परीक्षेतील संघर्ष, यश आणि विद्यार्थ्यांचे अनुभव मांडण्याची संधी

सावंतवाडी

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अधिकारी घडवणाऱ्या महेंद्रा अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘रील स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. “अधिकारी बनण्याचं स्वप्न… आता रीलमधून जगासमोर!” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत उत्कृष्ट रील बनवणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक रोख पारितोषिके आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. “महेंद्रा अकॅडमी — अधिकारी घडवणारी फॅक्टरी” ही स्पर्धेची मुख्य थीम असून स्पर्धा परीक्षेची तयारी, संघर्ष ते यशाचा प्रवास तसेच अकॅडमीमधील विद्यार्थ्यांचे अनुभव या विषयांवर आधारित एचडी क्वालिटीतील रील तयार करायची आहे. रीलचा कालावधी ६० सेकंद ते १ मिनिट ५० सेकंद इतका निश्चित करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी केवळ पहिल्या ५० स्पर्धकांनाच सहभाग दिला जाणार असून नाव नोंदणीची अंतिम तारीख २० मे २०२६ आहे. स्पर्धेचा कालावधी २१ मे ते ५ जून २०२६ असा राहणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी महेंद्र पेडणेकर (९०२२६८६९४४) किंवा आदित्य राऊळ (७५८८१४७०२८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा