*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न*
सिंधुदुर्ग
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व आंदुर्ले ग्रामपंचायत यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये आंदूरले गावचे सरपंच माननीय श्री अक्षय तेंडुलकर सर आंदुर्ले गावचे उपसरपंच मा अनिल भगत सर पाट गावचे ग्रामपंचायत सदस्य मामा ऋतुजा पाटकर मॅडम आंदूरले गावचे माजी उपसरपंच चंद्रकिसन मोरये सर
तेंडोली पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू सर जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील मॅडम भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई सर भाजपा तालुका अध्यक्ष कुडाळ संजय वेंगुर्लेकर सर भाजप पदाधिकारी मा राजू राऊळ सर आंदुर्ले शिपाई कर्मचारी, जिल्हा समन्वयक श्री अनिल शिंगाडे सर कर्मचारी विशाखा कासले मॅडम सौ प्रसन्ना शिर्के मॅडम ललित गावडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कर्मचारी विशाखा कासले मॅडम यांनी संस्थेचे थोडक्यात अहवाल वाचन केले.दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला विभाग वार मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी जिल्हा समन्वयक श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले. तसेच तेंडोली गावचे सरपंच अक्षय तेंडुलकर सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व या मेळाव्याचा आपण फायदा करून घ्यावा असे सांगितले. भाजप पदाधिकारी राऊळ सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.तसेच वेंगुर्लेकर सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे प्रसन्ना देसाई साहेब यांनी देखील दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. नवनवीन उपक्रम याबाबत मार्गदर्शन केले. व त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे असे आवाहन केले.तसेच ते बोलताना म्हणाले अनिल शिंगाडे सर हे सतत दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढा देत असतात ते लढा देत असताना तुम्हीही त्यांना साथ द्या असे आवाहन केले. महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतीने अंकुश सर्वेकर यांना हँड सायकल देण्यात आली.तसेच रजनी वलवणकर यांना त्यांच्या घरी जाऊन व्हिलचेअर देण्यात आली.
या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांची आवश्यक साहित्य नोंदणी करण्यात आली.या मेळाव्यामध्ये पन्नास हुन जास्त दिव्यांग उपस्थित होते.उपस्थित दिव्यांग बांधवांना जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच समाजामध्ये आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. कर्मचारी शिर्के मॅडम यांनी उपस्थित यांचा आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
