You are currently viewing जानवली -साकेडी फाटा येथे स्टॉलमध्ये सिलेंडरने घेतला पेट

जानवली -साकेडी फाटा येथे स्टॉलमध्ये सिलेंडरने घेतला पेट

कणकवली नगरपंचायतीच्या बंबाने विजविली आग

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली नजिक जानवली येथे साकेडी फाटा येथे एका स्टॉलमध्ये सिलेंडर लावत असताना अचानक सिलेंडरने पेट घेतला . या आगीत स्टॉलमधील साहित्याचे नुकसान झाले असून प्रसंगावधान राखत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. ही घटना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली येथे साकेडी फाट्याच्या ठिकाणी दिपक आचरेकर यांची टपरीला आहे.आज संपलेल्या सिलेंडरच्या जागी नवीन सिलेंडर बसवीत असताना या आगीच्या संपर्कात आल्याने सिलेंडरने अचानक पेट घेतला.यामुळे टपरी मधील साहित्य जळून नुकसान झाले.यावेळी जाणवली पोलिस पाटील मोहन सावंत यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर कणकवली नगरपंचायत लहान बंब येवून आग विजविण्यात आली. मात्र सिलेंडर पेटल्याने दिपक आचरेकर यांचे या आगीत नुकसान झाले आहे. याच दरम्यान तेथे असलेल्या होमगार्ड व ट्रॅफिक पोलीस यांनी मदत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा