अमरावती :
अमरावतीला परतवाडा रोडवरील वलगाव बस स्टॅन्ड जवळ असलेल्या वातानुकूलित सिकची रिसॉर्टमध्ये 16 मे पासून सुरू होणाऱ्या व 22 तारखेला संपणाऱ्या सात दिवसांच्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरामध्ये दीपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. या प्रकाशन समारोहाचे आयोजन मिशन आयएएस प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिवेणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील गाजलेल्या व सर्व परिचित असलेल्या 38 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या यशोगाथा समाविष्ट केलेल्या आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे आय ए एस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 22 रोजी सकाळी दहा वाजता सिकची रिसॉर्ट मध्ये संपन्न होणार आहे. अमरावती व नागपूर येथे कार्यरत असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा ज्ञानपथ पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाचे संपादन सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी केलेले आहे.
या पुस्तकामध्ये सुप्रसिद्ध सनदी अधिकारी सर्वश्री विकास खारगे तुकाराम मुंढे अश्विनी भिडे विजयालक्ष्मी बिदरी निधी पांडे डॉ.श्रीकर परदेशी मनोज कुमार शर्मा भाग्यश्री बानायत विशाल नरवाडे पुरुषोत्तम भापकर दिलीप पांढरपट्टे संगीता महापत्रा विशाल नरवाडे अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर अकोल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी ग्रामविकास मंत्रालयाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले मुख्यमंत्र्यांचे माजी सल्लागार श्री दीपक म्हैसेकर महाराष्ट्राचे प्रधान आयकर आयुक्त अभिनय कुंभार सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव श्री जे पी डांगे राहुल रेखावार भाग्यश्री बानायत रवींद्र जाधव तेजस्वी सातपुते भारत आंधळे पल्लवी चिंचखेडे अमरावतीचे सुपुत्र व दतीयाला जिल्हाधिकारी असलेले श्री स्वप्नील वानखडे श्रीमती सौम्या शर्मा चांडक अप्पर आयुक्त श्री राजेश खवले नम्रता ठाकरे वर्षा भाकरे प्राजक्ता बारसे अक्षय गडलिंग पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर प्राजक्ता बारसे या सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या यशोगाथांचा समावेश आहे.
दीपस्तंभ या गौरव ग्रंथामध्ये समाविष्ट असलेले बहुतांश अधिकारी गेल्या पंचवीस वर्षात डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमात वेळोवेळी सहभागी झालेले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. प्रकाशन स्थळी या पुस्तकाच्या प्रती उपस्थितांना उपलब्ध राहतील अशी माहिती या पुस्तकाचे संपादक व मिशनचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे. अशाप्रकारे गाजलेल्या 38 सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या एवढ्या मोठ्या संख्येने यशोगाथा असलेले मराठी मधील हे पहिलेच पुस्तक आहे.
प्रकाशनार्थ
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
