You are currently viewing “दरवाजा बाहेर” लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..!

“दरवाजा बाहेर” लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..!

मुंबई / (बबनराव आराख) :

मराठी चित्रपटसृष्टीत वास्तववादी आणि भावनिक कथानकावर आधारित “दरवाजा बाहेर” हा नवा मराठी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पाटील फिल्म प्रोडक्शन निर्मित या लघुपटाची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. “हा लघुपट नेमका कधी रिलीज होणार?” असा प्रश्न अनेकजण सोशल मीडियावर विचारताना दिसत आहेत.या लघुपटाचे निर्माता रमेश मारुती पाटील असून, कथा लेखन संतोष रामचंद्र जाधव यांनी केले आहे. तर पटकथा, संगीत आणि दिग्दर्शनाची जबाबदारी देखील रमेश मारुती पाटील यांनी सांभाळली आहे.“दरवाजा बाहेर” हा केवळ एक लघुपट नसून, प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी आलेल्या भावनांचा आरसा असल्याचं बोललं जात आहे. नात्यांमधील शांत वेदना, मनात दडलेले संघर्ष आणि आयुष्याच्या वळणावर उभ्या राहणाऱ्या भावनांना हा लघुपट हळुवार स्पर्श करणारा आहे. त्यामुळेच या लघुपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच ओढ निर्माण झाली आहे.लघुपटात कलाकार म्हणून या कथानकाचे लेखक संतोष जाधव, उपासना किरपण आणि स्वयंम जाधव यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक जिवंतपणा लाभला आहे.चित्रिकरणासाठी डी. के. विजन स्टुडिओचे सहकार्य लाभले असून, कॅमेरामन प्रविण शर्मा यांनी प्रभावी चित्रिकरण केले आहे.विशेष म्हणजे, हा लघुपट प्रेक्षकांना लवकरच Patil Film Production या YouTube चॅनेलवर पाहता येणार आहे. मनाला स्पर्श करणारी कथा आणि भावनांचा प्रवास घेऊन येणारा “दरवाजा बाहेर” प्रेक्षकांच्या हृदयात नक्कीच एक वेगळी जागा निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा