You are currently viewing न्हावेलीत सुधाकर राणे यांच्याकडून विलगीकरण कक्षाला थर्मामीटर, वाफेची उपकरणे प्रदान

न्हावेलीत सुधाकर राणे यांच्याकडून विलगीकरण कक्षाला थर्मामीटर, वाफेची उपकरणे प्रदान

न्हावेली :

न्हावेली ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत विलगीकरण कक्षासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा साई फ्लॉवर मर्चंटचे मालक सुधाकर राणे यांच्याकडून थर्मामिटर आणि वाफेची उपकरणे देण्यात आली आहेत. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. न्हावेली ग्रामपंचायतने स्थापन केलेल्या गाव विलगीकरण कक्षास दात्याकडून आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली जात आहे. या कक्षातील रुग्णांना वाफ घेता यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर राणे यांच्या कडून गावाला उपकरणाच्या माध्यमातून भेट दिली. यावेळी गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी श्री. राणे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. सद्यस्थितीत आवश्यक असलेले साहित्य दिल्याने त्यांचे योगदान महत्वपुर्ण असल्याचे उद्गार सरपंच प्रतिभा गावडे यांनी काढले. यावेळी राजन चेंदवनकर, साईगणेश राणे, श्रीपाद राऊळ, माजी सरपंच शरद धाऊसकर, सामाजिक कार्यकर्ते बाळू सावळ, उदय पार्सेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =