You are currently viewing कोणालाही कितीही ताकद पुरविली तरीही शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही- आ. वैभव नाईक

कोणालाही कितीही ताकद पुरविली तरीही शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही- आ. वैभव नाईक

भाजपचे असगणी सरपंच व भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आडवली-मालडी मतदारसंघात असगणीत भाजपला खिंडार

शिवसेना संपविण्याच्या अनेक वेळा वल्गना करण्यात आल्या. शिवसेना संपविण्यासाठी अनेकांना ताकद देण्यात आली. परंतु शिवसेना कधीच थांबली नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात चांगले काम सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोणाला मंत्री पद दिले, शिवसेनेच्या विरोधात कोणालाही कितीही ताकद पुरविली तरीही शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही शिवसेना वाढतच राहणार आहे. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात आली परंतु त्याचा परिणाम उलट झाला. देवगड मधील दोन नगरसेवक शिवसेनेत आलेत. कणकवली तालुक्यात शिवसेनेचे दोन सरपंच निवडून आले. व आता मालवण तालुक्यातील भाजप पक्षाच्या असगणी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचे पक्षात स्वागत आहे.असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

भाजप पक्षाचे असगणी सरपंच हेमंत पारकर यांच्यासह असगणी गावातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी शिवसेना पक्षात प्रवेश केला आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे पक्षात स्वागत केले. यामध्ये किरण पारकर,मेघश्याम पारकर,अनिल पारकर,विवेक पारकर, किशोर पारकर, अभिनंदन पारकर, निलेश पारकर, विठोबा पारकर, रश्मी पारकर, दीपाली पारकर, विद्या पारकर, रोहित पारकर, सविता पारकर, नूतन पारकर, सुवर्णा पारकर, अंजली पारकर, महेश पारकर, दिनेश पारकर, विशाल पारकर, राजेश पारकर, दया मिठबावकर, प्रकाश पोयरेकर, प्रतिभा पोयरेकर, सुनील मिठबावकर, उर्मिला गोलतकर,जितेंद्र गोलतकर ,दशरथ चव्हाण आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
कितीही जन आशीर्वाद झाल्या तरी आडवली-मालडी विभाग भगवामय केल्याशिवाय राहणार नाही. भाजपाला असे अनेक धक्के येत्या काळात देण्यात येणार आहेत असे यावेळी विभाग प्रमुख बंडू चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उप तालुकाप्रमुख बाबा सावंत, विभाग प्रमुख बंडू चव्हाण, माजी विभाग प्रमुख दीपक राऊत, विभाग संघटक संतोष घाडी, उपविभागप्रमुख प्रवीण परब, दुलाजी परब, युवासेना वि. प्र. बंडू गावडे, हेदूळ सरपंच नंदू गावडे,ओवळीये सरपंच आंबाजी सावंत, रामगड सरपंच विलास घाडीगावकर, हिवाळे सरपंच पुरुषोत्तम खेडेकर, वायंगवडे सरपंच आंनद सावंत, शाखा प्रमुख देवेंद्र पुजारे, उपसरपंच यशवंत राऊत, सोनू चव्हाण पोईप विभागप्रमुख विजय पालव, कृष्णा पाटकर,पराग नार्वेकर, नाना नेरकर, सुभाष धुरी,किरण प्रभू, रामचंद्र राऊत, सुरेश पुजारे,सुमीत्रा कासले, आनंद चुरमुले, दशरथ घाडी, मनोहर कासले, संतोष चव्हाण, सतीश लब्दे, बंडू कासले,सुनील परब,नामदेव चव्हाण रमेश कासले आदींसह शिवसैनिक उपस्थित

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =