मुलासाठी आई दान करणार मूत्रपिंड; मात्र गरीब कुटुंब असल्याने आर्थिक मदतीची गरज..

मुलासाठी आई दान करणार मूत्रपिंड; मात्र गरीब कुटुंब असल्याने आर्थिक मदतीची गरज..

सावंतवाडी

वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील योगेश वसंत साळसकर (वय ३५ ) यांचे दि.२५ जून रोजी ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे मूत्रपिंड बदलीचे (kidney replacement) ऑपरेशन आहे आणि यासाठी त्याची आई श्रीमती गीता वसंत साळसकर स्वतःचे मूत्रपिंड दान करणार आहेत. या ऑपरेशनचा अंदाजित खर्च सहा लाखापर्यंत आहे. मदतीची अपेक्षा आहे.

सध्या योगेश,त्यांचे थोरले बंधू भूषण वसंत साळसकर यांच्या घरी मानपाडा ,ठाणे इथे रहायला आहे. सध्या सर्व धावपळ एकटे भूषण हेच करत आहे. भूषण यांची लहान खाजगी नोकरी असल्यानें त्यांनी या ऑपरेशनसाठी अडीच लाखापर्यंत रक्कम स्वतःच्या बचती मधून जमवली आहे.

या ऑपरेशनसाठी के.इ.म. या सरकारी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले या योजने अंतर्गत सुदधा प्रयत्न केले. परंतु आधीच कोरोनाची परिस्थिती अस्थिर असल्याने शिवाय आधीच्या रुगणाची प्रतीक्षा यादी असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबिय याना योगेशचे ऑपरेशन खाजगी रुग्णालयात करा असे सांगितले.

तर योगेश यांची दोन मूत्रपिंडापैकी एक मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झाले आहे आणि दुसरे मूत्रपिंड तुलनेने लहान असल्याने त्याची क्षमता देखील कमी आहे, आणि हे ऑपरेशन फार तातडीचे असल्याने त्याचे भाऊ भूषण साळसकर यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्याचा निर्णय घेतला. त्याची घरची परिस्थिती बिकट आहे.

तसेच एक किडनी निकामी झाल्याने झाल्याने सद्या मानसिक दुष्टया ग्रासला आहे,मूत्रपिंड बदलीचे (kidney replacement) ऑपरेशन करण्यासाठी त्याला सहा लाख रुपयाची गरज आहे,त्यामुळं याचे जिवन वाचवण्यााठी दात्यानी आर्थिक आपल्या यथाशक्ती प्रमाणे योगेश याला त्याच्या ऑपरेशनसाठी मदत करावी. असे आवाहन करण्यात येत आहे.

सदर बँक खाता नंबर त्याची सविस्तर माहिती देत आहोत, ज्याला कोणाला मदत करायची असेल त्यानी सदर बँक खात्यात रक्कम पाठवावी असे आवाहन केले जात आहे,नाव भूषण वसंत साळसकर

AC NO :-098801510652

IFSC CODE :-ICIC0000988 मोबाईल नंबर 8879405044 असा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा