You are currently viewing जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोज

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोज

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 सिंधुदुर्गनगरी

 मे महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, १८ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या अडचणी  सोडविण्यासाठी  करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे.

राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी समान हक्क असा मुलभूत अधिकार दिलेला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी  किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी हा कार्यक्रम घेतला जातो.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना प्रश्न मांडून,त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा एक उत्तम मार्ग आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करुन घ्यावेत.

अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज, किंवा सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदने वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही श्री. शिणगारे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा