You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा डेपोला आग

सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा डेपोला आग

अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण; परिसरात धुराचे लोट

सावंतवाडी :

शहराच्या सीमेवरील नगरपरिषदेच्या कचरा डेपोला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

डेपोमध्ये सुक्या कचऱ्याचा साठा असल्याने आग वेगाने पसरली. मात्र अग्निशमन दल व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या वेळी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, अक्षय पंडित, शेखर मेहतर, अग्निशमन कर्मचारी नंदू गावकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा