कणकवली :
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळरे येथील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.प्रशालेमधून एकूण49 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. 47 विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेचा निकाल 95.92% लागला आहे.
यामध्ये विद्यालयातील स्वयंम मिलिंद महाडिक याने (441गुण) 88.20% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शुभम महेश तेली(437 गुण) 87.40% मिळवत द्वितीय तर अथर्व संतोष जठार याने (421 गुण) 84.20% मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चिटणीस श्रीकृष्ण तुकाराम खटावकर,शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अरविंद महाडिक,सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद,आजी-माजी सर्व विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ यांचेकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
