*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नजर शोधते पोर कोवळी*
व्यथीत होता थेऊर गणेश
स्वप्नात आला काल रात्री
बसलो होतो रामद-यात
केली त्या बातमीची खात्री
//1//
शिष्य भेटले तिथले अनेक
लिहून टाकले काव्य एक
कानी येता वाटले वाईट
पुणे न राहिले आता नेक
//2//
आले अश्रू नयनी तेव्हा
ऐकून बातमी “भयंकर”
आग झाली तळपायाची
नयनी लोटला “अश्रुपूर”
//3//
चळले रंगेल सारे म्हातारे
मोहरू लागले साले आज
वयाकडे तरी तिचे बघायचे
गुंडाळून बसले सारी लाज
//5//
कशा ठेवणार घरात पोरी
चळलेत थेरडे सर्व स्थळी
डुलकी लागता *दुपारची*
नजर शोधते पोर कोवळी
//6//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मोबाईल/9324324157
