You are currently viewing वादळी पावसाची शक्यता रस्त्यालगतची धोकादायक झाडे किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडा – रवी जाधव
Ravi jadhav

वादळी पावसाची शक्यता रस्त्यालगतची धोकादायक झाडे किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडा – रवी जाधव

वादळी पावसाची शक्यता रस्त्यालगतची धोकादायक झाडे किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडा – रवी जाधव

सावंतवाडी

काल सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रस्त्यालगत असलेली जांभूळ व रुंबडाच्या फळांमुळे रस्ता पूर्णपणे बुळबुळीत झाला होता त्यामुळे अशा रस्त्यावर स्लीप होऊन ठीक ठिकाणी अनेक अपघात होऊन मोटरसायकलस्वार जखमी झाले होते. तरी येथील नागरिकांनी प्रशासनावर अवलंब न राहता आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणचा रस्ता पाणी मारून साफ करून घेणे जेणेकरून कुणाचा तरी जीव वाचू शकतो तरी आपणास शक्य नसले तर याबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी आपण संपर्क करू शकतात असे रवी जाधव यांनी सांगितले. तरी देखील प्रशासनाने जनतेची योग्य अशी काळजी घेणे गरजेचे आहे तसेच काही दिवसातच जोरदार वादळ व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठच्याही प्रकारची जीवितहानी नको यासाठी हायवेवरील तसेच शहरातील रस्त्यांच्या बाजूला असलेल्या धोकादायक व जीर्ण झाडे किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडून घ्या अशी विनंती नगरपालिका प्रशासन बांधकाम विभाग व वन विभाग यांच्याजवळ सामाजिक बाधिल प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे. गेल्या वर्षी 15 मे ला भटवाडी येथील रस्त्यालगत असलेलं मोठ आंब्याचे झाड तुटून हाय व्होल्टेज मेन विद्युत लाइनीवर पडल्यामुळे रस्त्यावरील आठ विद्युत लाईन पोल मोडून पडले होते त्यामुळे त्या भागात चार दिवस लाईट नव्हती त्यामुळे त्या भागातील व्यावसायिक व नागरिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते परंतु सुदैवाने अनर्थ टळला कुठच्याही प्रकारची जीवित हानी झाली नव्हती परंतु अशा प्रकारच्या धोकादायक व जीर्ण झालेल्या झाडांसंदर्भात सदर झाड मालकाला धोकादायक झाड किंवा त्याच्या फांद्या तातडीने तोडून घेण्यास नगर परिषदेने नोटीस काढावे याचे कारण त्यानंतर होणाऱ्या नुकसानास सर्वसामान्य माणसाला सामोरे जाऊ लागू नये याबाबत प्रशासनाने योग्य तो विचार करून सदर कार्यवाही तातडीने करावी असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी प्रशासनाला विनंती केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा