*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका , समाजसेविका, कथाकार, पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निसर्गाची शाळा*
निसर्गाची शाळा भरली
निसर्गाची शाळा
इथे नाही मास्तर बाई
इथे नाही फळा
हिरव्या हिरव्या शाळेत
सगळे हिरवेगार
इथे नाही पुस्तक पाटी
इथे नाही मार
इथे आहेत फुलाफुलांनी
बहरलेली झाडे
फांद्यांवरती गाणारे
पक्षी आभाळवेडे
हत्तीदादा व्यायामाची
इथे शाळा घेतात
संकटातून कसं तरायचं
यांचं शिक्षण देतात
जिराफ सांगतो जगात या
ताठ मानेने जगा
घोडा म्हणतो शक्ती कशी
कामवावी ते शिका
झाड शिकवणं
सावली दे
फूल शिकवतं
सुंगध दे
अनुपमा जाधव
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७
