You are currently viewing सिंधुदुर्गनगरीत सुशोभित सर्कलचे उद्घाटन; शहर सौंदर्यात भर
Oplus_16908288

सिंधुदुर्गनगरीत सुशोभित सर्कलचे उद्घाटन; शहर सौंदर्यात भर

पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; रोटरी क्लबच्या पुढाकारातून चौकाला आकर्षक रूप

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील नादुरुस्त अवस्थेत असलेल्या सर्कलचे रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या पुढाकारातून सुशोभीकरण करण्यात येऊन त्याचे उद्घाटन उत्साहात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या काही काळापासून हा चौक दुर्लक्षित अवस्थेत होता. त्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांनी पुढाकार घेत संबंधित प्राधिकरणाची लेखी परवानगी मिळवून सर्कलचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार क्लबच्या सदस्यांनी स्वखर्चातून आणि स्वयंप्रेरणेने सर्कलचे आकर्षक रूपांतरण केले.

या सुशोभीकरणामुळे सर्कलला नव्या स्वरूपात ओळख मिळाली असून शहराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे. तसेच नागरिकांसाठी हा परिसर अधिक आकर्षक आणि सुटसुटीत झाला आहे.

या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या सदस्यांनीही मोलाचे सहकार्य केले. उद्घाटन प्रसंगी प्रभाकर सावंत, डॉ. प्रशांत कोलते, अरूण मालणकर, दीपक आळवे, प्रथमेश सावंत, ललित वंजारे, ऋषिकेश रेडकर, उदयकुमार जांभवडेकर, नवीन बांदेकर, सत्यवान चव्हाण, सागर कुशे, अमेय बर्डे, डॉ. श्रद्धा मालवणकर, अभिजित जैतापकर, विवेक राणे, व्यंकटेश घोगळे आणि सिद्धांत सावंत आदी रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रलचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सामाजिक संस्थांच्या सहभागातून शहर विकास कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण निर्माण झाले असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा