*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझ्या नावाचा रस्ता …!!*
या मातीत पुन्हा उगवायच नाही
अश्या धमक्या… मला दिल्यात
त्यांनीच माझ्या मायेची पसरलेली
मुळं मुळापासून..तोडायला लावलीत
माझ्याच बरगड्यांवर विनाशाचे रंग त्यांनी रंगविले
माझ्या श्वासांचे भांडवल त्यांनी केले
कालांतराने ते चेहरे बदलत गेले
काही दिसू नये..पाठमोरे जावून बसले
मायेच आभाळ येथे पांघरू नकोस
वेटोळे घालून माझ्याभोवती वारूळ त्यांनी उभारले
माझ्या दाराशी निःशब्द कोलाहल करत
शेवटी..नेऊन मला गाभा-यात बसविले
आयुष्यभर ज्यांनी दिला खस्ता
त्यांनीच उभारला माझ्या नावाचा रस्ता
त्या रस्त्यावरून सध्या कुणीही जात नाही..कठीण खडकाळ..सत्याचा
हल्ली कालबाह्य झाला …तो रस्ता
सत्याच्या रस्त्यावर..माझा पुतळा उभा त्यांनी केला…माझ्या रस्त्यावर…
मलाचं अडथळा..
बाबा ठाकूर
