You are currently viewing जय शिवराय

जय शिवराय

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी स.पो.नि. वासुदेवराव खोपडे यांची काव्यरचना*

*शिवजयंतीच्याहार्दिकशुभेच्छा💐*
*जय शिवराय*

काय वर्णू मी थोरवी
शूरवीर शिवबांची
महाराष्ट्रात रोवली
मुहूर्तमेढ स्वातंत्र्याची !!

अधर्मासंगे लढले
धर्मासाठी न्यायासाठी
माणुसकीच पूजली
लढलेत हक्कासाठी !!

परस्त्री माते समान
महामंत्र त्यांनी दिला
मानून लेकी समान
बोळविले शत्रू सुनेला !!

जातिपंथास नसेच थारा
मानले सर्वधर्म समान
स्वराज्यासाठी प्राणपणाने
लढले हिंदू,मुसलमान !!

शककर्ता युगपुरुष
धन्य ती जिजाऊ माय
कोटी मुजरे तयांसी
जय जय शिवराय !!

माय भवानी पावली
दिली अजिंक्य तलवार
जिजाऊ नर रत्न पुत्र
शिवाचाच अवतार !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा.पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा