*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम अभंग*
*पाणी देवदूत*
वैशाख वणवा/ सुर्य हा तापला/
ओकतो आगीला /उन्हाळ्यात //१//
शेतात राबतो/घामाने शिजतो/
उन्हात मरतो/शेतकरी//२//
विहीर आटली/नदी ही सुकली/
जमीन फाटली/उन्हामुळे//३//
उन्हाचा तडाखा/जीवाची काहिली/
या देही पाहिली/आयुष्यात//४//
घशाला कोरड/रानात सजीव/
भटकतो जीव/पाण्यासाठी//५//
नको उतमात/पाण्याचा निचरा/
जपून वापरा/मोल जाणा//६//
तहान भागवी/जीवाची वाहिनी/
चंदू म्हणे पाणी/देवदूत//७//
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
