ठाणे :
ठाणे महानगरपालिकेच्या पंडीत दीनदयाल निराधार, बेघरनिवारा केंद्र, तीन पेट्रोल पंप (जवळ) येथे शुक्रवारी “महाराष्ट्र दिन”, “वैशाख पौणीॅमा”तसेच बुध्द पौणीॅमे निमित्त (१ मे २०२६ रोजी) सायंकाळी सहा वाजता एका आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निराधार बेघर केंद्रातील २५ आजी-आजोबांना धान्यदान करण्यात येणार आहे. यावेळी त्यांना स्नेहभोजन ही देण्यात येणार आहे.
माऊली श्रीज्ञानेश्वरांच्या पसायदानावर आधारित निरूपण साहित्यिका सौ. शुभांगी पासेबंद करणार आहेत तर साहित्यिक, पत्रकार एडवोकेट रुपेश पवार पसायदानाचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन व स्नेहभोजन व्यवस्था, समाजसेवक, लेखक राजेंद्र गोसावी यांच्या नाट्यतुषार संस्थेकडून करण्यात आली आहे. चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट ,आणि नाट्यतुषार यांचा हा संयुक्तिक कार्यक्रम आहे.
दानशूर, संवेदनशील ठाणेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून. दीनदयाल बेघर निराधार केंद्राला आमच्या संस्थेमार्फत सहकार्य करावे. त्यातून आपण सत्पात्रीदान करून आमच्या सेवाकार्याला हातभार लावावा, असे आवाहन अँड.रूपेश पवार व राजेंद्र गोसावी यांनी केले आहे.
नाट्यतुषार
