You are currently viewing तिलारी नदीत वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह अखेर सापडला

तिलारी नदीत वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह अखेर सापडला

तिलारी नदीत वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह अखेर सापडला

घोटगे कॉजवे परिसरात सहा वर्षीय रेगणचा मृतदेह आढळला; अनुरंजनचा शोध सुरूच

दोडामार्ग

तिलारी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात घोटगेवाडी कॉजवे परिसरात वाहून गेलेल्या सहा वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह अखेर दुसऱ्या दिवशी सापडला. रेगण दिलीप बडा (वय ६, रा. छत्तीसगड) याचा मृतदेह घोटगे कॉजवे शेजारी आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी सायंकाळी तिलारी नदीच्या पुराच्या प्रवाहात रेगण याच्यासह २५ वर्षीय अनुरंजन किसपोट्टा बिजापन्नी हे दोघे वाहून गेले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांनी आज रेस्क्यू टीमसोबत स्वतः पाण्यात उतरून शोधकार्यात सहभाग घेतला. नदीचा वेगवान प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पातळी असतानाही बचाव पथकाने धोकादायक परिस्थितीत शोधमोहीम राबवली.
सोमवारी रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी घोटगे कॉजवे शेजारी रेगणचा मृतदेह रेस्क्यू पथकाच्या हाती लागला.
मात्र, २५ वर्षीय अनुरंजनचा अद्याप शोध लागलेला नसून त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाची मोहीम सुरूच आहे. तिलारी नदीच्या प्रवाहात घडलेल्या या दुर्घटनेमुळे घोटगेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा