You are currently viewing संजु परब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कृष्ण हनुमान युद्ध’ नाट्यप्रयोग

संजु परब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कृष्ण हनुमान युद्ध’ नाट्यप्रयोग

१९ फेब्रुवारीला गोविंद चित्र मंदिर येथे आयोजन; नाट्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी : सह्याद्री फाउंडेशन, सावंतवाडीच्या वतीने सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री. संजु परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

हा नाट्यप्रयोग १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गोविंद चित्र मंदिर, सावंतवाडी येथे होणार आहे. या नाट्यप्रयोगाचा सर्व नाट्यप्रेमींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील राऊळ आणि विद्यमान अध्यक्ष श्री. रविंद्र मडगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा