राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिवपदी काका कुडाळकर…

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिवपदी काका कुडाळकर…

सिंधुदुर्ग राष्ट्रवादीला नवचैतन्य

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटक सचिव पदी हेमंत उर्फ काका कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कुडाळकर यांना नियुक्तीपत्र दिले.
काका कुडाळकर यांच्याकडे उत्कृष्ट संघटन कौशल्य आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी तळागाळातील जनतेला न्याय मिळण्यासाठी, प्रशासनावर आपला वचक निर्माण केला होता. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले होते. उत्कृष्ट वक्तृत्व शैली असलेल्या काका कुडाळकर यांची प्रवक्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. काका कुडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीला नवचैतन्य आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा