You are currently viewing शिरोडा नागदेवता मंदिराचा २१ वा वर्धापन दिन भक्तिभावात साजरा होणार

शिरोडा नागदेवता मंदिराचा २१ वा वर्धापन दिन भक्तिभावात साजरा होणार

शिरोडा नागदेवता मंदिराचा २१ वा वर्धापन दिन भक्तिभावात साजरा होणार

शनिवार, २ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिरोडा :

गावडेवारी येथील श्री नागदेवता व श्री लक्ष्मी महाविष्णू मंदिराचा २१ वा वर्धापन दिन शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्त सकाळी अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी प.पू. गावडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भजन, आरती तसेच श्री व्यंकटेश स्तोत्र पठण आदी कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प.पू. श्री गावडे गुरुजी यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी भाविकांनी मांसाहार, धूम्रपान व मद्यपान टाळावे, असेही त्यांनी सूचित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा