You are currently viewing तळकट (दोडामार्ग) ग्रामदेवता श्री.देवी माऊलीचा जत्रोत्सव उद्या

तळकट (दोडामार्ग) ग्रामदेवता श्री.देवी माऊलीचा जत्रोत्सव उद्या

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील जागृत देवस्थान तळकट (दोडामार्ग) ग्रामदेवता श्री.देवी माऊलीचा जत्रोत्सव उद्या दि. ०१ जानेवारी २०२२ रोजी साजरा होणार आहे.
सकाळी १० वाजल्यापासून श्री.माऊली चरणी ओटी भरणे, नवस करणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ १२ वाजता पालखी सोहळा व त्यानंतर रात्रौ ०१ वाजता मामा-मोचेमाडकर दशावतार कंपनी चा नाट्यप्रयोग साजरा होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − two =