You are currently viewing अखिल भारतीय गंधर्व कला महाविद्यालय आयोजित पखवाज प्रारंभिक परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्पृहणीय यश

अखिल भारतीय गंधर्व कला महाविद्यालय आयोजित पखवाज प्रारंभिक परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्पृहणीय यश

अखिल भारतीय गंधर्व कला महाविद्यालय आयोजित पखवाज प्रारंभिक परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्पृहणीय यश

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयांतर्गत आयोजित पखवाज प्रारंभिक परीक्षेत स्पृहणीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत प्रशालेतील इयत्ता ७ वी मधील कु. हेरंभ नाटेकर , इयत्ता ४ थी मधील कु. श्रीहान मुंज, इयत्ता ५ वी मधील कु. वरद सावंत, कु. केवल मांद्रेकर, कु. कुशल तांडेल या सहभागी पाचही विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावत उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि त्यांना लाभलेले शिक्षक श्री. संकेत म्हापणकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा