You are currently viewing दाजी तुमचं कोंबडं

दाजी तुमचं कोंबडं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लावणी*

 

*दाजी तुमचं कोंबडं* 

 

दाजी तुमचं कोंबडं लई भेकाट कोकावतं

अन् माझ्या दिलात भलतंच धडधड होतं ||धृ||

 

तुमचं कोंबडं हाय मोठं लई लई भारी

लालतुरा त्याचा उठून दिसतो डोईवरी

गडी रांगड फडफडतं रूबाबात उडतं

अन् माझ्या दिलात भलतंच धडधड होतं ||१||

 

तुमचं कोंबडं जरा डालकीत ठेवा झाकून

तेव्हा मला येता येईल दरबारात वाकून

तंगडं बांधा त्याचं उठसूठ अंगावर येतं

अन् माझ्या दिलात भलतंच धडधड होतं ||२||

 

तुमच्या कोंबड्याची तुम्ही मिरवा फुशारी

नजर फिरवा नसानसात भरली उभारी

रगारगात कोंबड्यावानी बळ संचारतं

अन् माझ्या दिलात भलतंच धडधड होतं ||३||

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर,धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा