*साळगाव महाविद्यालयात बी.ए./बी.कॉम प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू..*
साळगाव:
शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी संचलित, परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव मध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता बी.ए. आणि बी.कॉम पदवीसाठी पूर्व नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही नोंदणी प्रक्रिया महाविद्यालयात सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांनी सांगितले की, इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधून पूर्व नोंदणीसंबंधी माहिती मिळवून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
विद्यार्थ्यांसाठी अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत:
प्रा. सिंगनाथ: 8805155247
प्रा. चव्हाण: 8767378704
विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून आपले शिक्षण सुरक्षित करण्याची संधी लाभावी, असे महाविद्यालयाने आवाहन केले आहे.
