आकर्षक रोषणाईसह विविध कार्यक्रमांची रेलचेल
सावंतवाडी : दीपावली सणानिमित्त अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीमंत शिवरामराजे यांच्या पुतळ्याजवळ हा दीपोत्सव संपन्न होणार आहे.
या दीपोत्सवानिमित्त नागरिकांसाठी विशेष ‘दीपावली शुभेच्छा सेल्फी पॉईंट’ उभारण्यात येणार असून, यासोबतच अनेक मनमोहक आणि आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. ऐतिहासिक मोती तलावाचा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार असल्याने या दीपोत्सवाला विशेष शोभा प्राप्त होणार आहे.
दीपावलीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना उत्सवाचा आनंद घेता यावा, हा अभिनव फाउंडेशनचा प्रयत्न आहे. या देखण्या दीपोत्सवाची शोभा वाढविण्यासाठी सावंतवाडीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
