You are currently viewing निष्ठा यात्रेनिमित्त युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात

निष्ठा यात्रेनिमित्त युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात

शिवसेना जिल्हाप्रमुख, आ.वैभव नाईक यांची माहिती

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. तर १२ वाजता सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेला ते संबोधित करणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा