*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात लेखणीचे महत्व*
आजच्या युगात नवीन तंत्रज्ञान खूप विकसित झालेले आहे विज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे, आता मानवी प्रयत्नापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान विज्ञानिक प्रगती व यांत्रिकीकरणाला फार महत्व आहे हे आपण रोजच्या जीवनात पाहतो, नव्हे अनुभवतो .आम्ही लहान असतांना त्यावेळी या प्रगतीबद्दल आम्हाला आठवीत इंग्रजीत एक धडा होता त्यातले as soon as the button is on chutney is ready हे वाक्य मला अजून आठवते व एका मिनिटात मिक्सर वर होणारी ही कृती आम्हाला कौतुकास्पद वाटे तेंव्हा आमच्या पर्यंत विज्ञानाची ही प्रगती पोहचलेली नव्हती
आज तर चमत्कार वाटावा असे बदल झालेले आहेत प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्रास पणे केला जातो आजचे विद्यार्थी सुद्धा दिलेले गृहकृत्य A I च्या मदतीने सर्रास पणे सोडवतात , सोशल मीडियामुळे कोणतेही क्षेत्र या पासून वंचित नाही, गृहिणीला एखादा नविन पदार्थ बनविण्यासाठी घरातील अनुभवी स्त्रीची मदत घेणे आवडत नाही सगळीकडे कृत्रिम, तांत्रिक साधनांचा उपयोग करून होतो मग ते किराणा सामान असो किंवा औषधे अगदी भाजी खरेदीविक्री पासून तर प्रवास वाहने सगळी देवाण घेवाण सर्रास पणे आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते साहित्य क्षेत्र सुद्धा यातून सुटलेले नाही
कोणत्याही विषयावर लेखलेखन, कविता, भाषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सहज उपलब्ध झालेले असते मनुष्याला स्वतः ची विचारशक्ती वापरण्याची गरजच उरत नाही. अशावेळी लेखणीचे महत्व किंवा जवाबदारी अधिकच वाढली आहे असे मला मनापासून वाटते लेखणी वापरूनच जुन्या काळात संत तुकाराम ज्ञानेश्वर रामदास एकनाथ ह्या मंडळींनी लिखाण करून स्वतःच्या साहित्यप्रतिभेचे दर्शन घडविले तर ह ना आपटे, वि. स, खांडेकर ना सि फडके न चि केळकर प्र के अत्रे अशा मोठया मंडळीनी साहित्य सेवा केली केशवसुत, बाल कवी, यशवंत गोविंदाग्रज अशा मंडळींच्या काव्यरचना आजही ताज्या प्रेरणादायी आहेत साहित्य क्षेत्रात जर
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला तर त्यात नैसर्गिकता राहणार नाही सवंग प्रसिद्धीसाठी साहित्यसमूहात काही जण कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करीत असले तरी असे साहित्य फार काळ टिकू शकणार नाही. म्हणूनच स्वबुद्धीवर लिहिणाऱ्या हातांची जवाबदारी व महत्व वाढलेले आहे असे मला तरी प्रांजळपणे वाटते
विज्ञानाने कितीही प्रगती केली कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर जगावर राज्य केले तरी लेखणीचे महत्व कमी होणार नाही
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
