You are currently viewing श्रीधरराव नाईक यांचे आदर्शवत समाजकार्य पुढे सुरू ठेवणार- वैभव नाईक

श्रीधरराव नाईक यांचे आदर्शवत समाजकार्य पुढे सुरू ठेवणार- वैभव नाईक

श्रीधरराव नाईक यांचे आदर्शवत समाजकार्य पुढे सुरू ठेवणार- वैभव नाईक

*कै. श्रीधरराव नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन साजरा*

कणकवली

श्रीधरराव नाईक यांचे समाजकारणात फार मोठे काम होते.लोकांची छोटी छोटी कामे करत असताना त्यांचा राजकीय उदय झाला होता. मात्र,सूडबुद्धीने त्यांची राजकीय हत्या करण्यात आली आज त्या घटनेला ३५ वर्षे झाली.मात्र,त्या काळात त्यांनी केलेले काम आणि विचार आजही जिवंत आहे. श्रीधरराव नाईक यांच्या समाजकार्याचा वारसा आम्ही नाईक कुटुंबीय जोपासत आहोत. हे समाजकार्य असेच पुढे सुरू ठेवणार आहोत. हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन कार्यक्रम करताना नव्या पिढीसमोर विचार ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली आहे. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहिल असे प्रतिपादन माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले.

कै. श्रीधरराव नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन आज कणकवली येथील श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात आला. प्रथमतः श्रीधरराव नाईक यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर दीपप्रज्वलन करून स्मृतिदिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान यावेळी कै. श्रीधर नाईक फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच कणकवलीतील २०० शेतकऱ्यांना घमेल, फावडे, सुपारीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. २० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.कणकवली शहरातील १५ वायरमन यांना रेनकोट देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार विनायक राऊत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत,शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख निलम पालव,उद्योजक मुरलीधर नाईक, उद्योजक सतिश नाईक,नगरसेवक संकेत नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर,अशोक करंबळेकर,व्हीके सावंत, श्री मोदी, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,नगरसेवक जयेश धुमाळे,लुकेश कांबळे,नगरसेविका जाई मसुरकर,दिपीका जाधव, राजू राठोड,बाळा भिसे, महेश कोदे, उत्तम लोके,वैदेही गुडेकर,दिव्या साळगावकर,बाळु मेस्त्री,धीरज मेस्त्री, तेजस राणे, रोहित राणे, प्रमोद कावले,मुरलीधर परब, रवि परब, बबली राणे, दिलीप तळेकर, सुमित राणे, श्री. जेठे,श्रीधर नाईक फाउंडेशनचे रवी भंडारे, महेंद्र नाईक,लक्ष्मण हन्निकोड,उत्तम सुद्रिक,अक्षय कीर्तने, सचिन राणे आदी श्रीधर नाईक प्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा