You are currently viewing दिव्यांगांनी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांगांनी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांगांनी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील 18 ते 60 वयोगटातील दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य करण्याकरीता वैयक्तिक थेट कर्ज योजना व दिव्यांग स्वालंबन कर्ज योजना राबविण्यात येतात. या योजना अनुक्रमे  महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळामार्फत राबविण्यात येतात.

               या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या www.mshfdc.co.in या संकेतस्थळावरील डाऊनलोमध्ये कर्ज योजनांचे अर्ज व महामंडळाचे माहितीपत्रक  https://mshfdc.co.in/index.php/2013-04-12-13-20-56 या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आली असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ मर्या.चे जिल्हा व्यवस्थापक के.व्ही. लोहकरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा