स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पर्यावरण संमेलन
येत्या 6 जून रोजी असलेल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त यावर्षी आयएएस च्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलन व पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम अमरावती शहराला लागून असलेल्या वलगाव येथील भव्य अशा व आठ एकरात असणाऱ्या सिकची रिसॉर्ट व कृषी भवन येथे संपन्न होणार आहेत. श्री प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी यांनी संयुक्तपणे मिशन आयएएस अंतर्गत या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
गेल्या 25 वर्षापासून मिशन आयएएसतर्फे त्या त्या वर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. आतापर्यंत मिशनने सुप्रसिद्ध आय ए एस अधिकारी श्री जे पी डांगे रत्नाकर गायकवाड एकनाथ डवळे तुकाराम मुंढे डॉ.श्रीकर परदेशी श्री विकास खारगे अभिनय कुंभार डॉ.सुधीरकुमार गोयल दिनेश वाघमारे मधुकर कोकाटे किशोर गजभिये रवींद्र जाधव पुरुषोत्तम भापकर ओमप्रकाश गुप्ता मनीषा वर्मा मिलिंद म्हैसकर मनीषा म्हैसकर राहुल रंजन महिवाल डी आर बनसोड शेखर गायकवाड कौस्तुभ दिवेगावकर आस्तिक पांडे रामराव घाडगे बाबासाहेब कंगाले दिलीप स्वामी संदीप राठोड दिलीप स्वामी हेमंत कोठीकर रवींद्र ठाकरे अश्विनी जोशी अरुणकुमार डोंगरे सारंग वानखडे सृष्टी देशमुख संदीप राठोड राहुल रेखावार प्रशांत होळकर अमृतेश औरंगाबादकर सेना अग्रवाल लक्ष्मीनारायण मिश्रा प्रेरणा देशभ्रतार दीपक म्हैसेकर आस्तिक पांडे उदय चौधरी विठ्ठल जाधव स्वप्निल वानखडे आशिष ठाकरे मनोज महाजन भाग्यश्री बानाईत प्रशांत रोडे, प्रशांत होळकर हिरा लाल आशिष पाटील विष्णू आवटी मानसी पाटील मिताली शेठी कविता पाटील मयूर सूर्यवंशी भुवनेश पाटील आणि गतवर्षी आयएएस झालेले श्री रजत पत्रे अभिदा शेख जयकुमार आडे अश्विनी धामणकर पंकज पाटील अभिनव देशमुख नम्रता ठाकरे मोहिनी खंडारे अभय देशमुख यांचा भव्य सत्कार आयोजित केलेला आहे .
यावर्षी आयएएसचा निकाल लागल्यानंतर 24 मे 20260 ला आयएएसची पूर्व परीक्षा आल्यामुळे हे सत्कार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जून महिन्यात आयोजित करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर विदर्भातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना सविस्तर मार्गदर्शन मिळावे यासाठी चौथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे .
पाच जूनला पर्यावरण दिन असल्यामुळे पर्यावरण पूरक निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा काव्य स्पर्धा तसेच भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ज्यांना या उपक्रमात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी अधिक माहितीसाठी डॉ.पंजाबराव देशमुख आय ए एस च्या सहसंचालिका प्रा
पल्लवी नरेशचंद्र काठोळे 9823294326 किंवा सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर 787571 3975 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएस या संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे.
प्रा डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
