You are currently viewing तरुणांना उद्योगाची दिशा देणाऱ्या MCEDच्या ‘IT’ प्रशिक्षणाचा शुभारंभ

तरुणांना उद्योगाची दिशा देणाऱ्या MCEDच्या ‘IT’ प्रशिक्षणाचा शुभारंभ

तरुणांना उद्योगाची दिशा देणाऱ्या MCEDच्या ‘IT’ प्रशिक्षणाचा शुभारंभ

सभापती सुष्मिता जाधव यांच्या हस्ते गवाणकर कॉलेजमध्ये उद्घाटन; २९ प्रशिक्षणार्थींचा सहभाग

सावंतवाडी :

जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित ‘IT’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव यांच्या हस्ते गवाणकर कॉलेज, सावंतवाडी येथे करण्यात आले.
यावेळी MCEDचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर, कार्यक्रम समन्वयक सुषमा साखरे तसेच गवाणकर कॉलेजचे शैलेश गावडे उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण २९ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे, त्यांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने MCEDच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्यासोबत १ हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना CMEGP तसेच इतर विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळणार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, शासकीय योजनांचा लाभ आणि व्यवसायाच्या विविध संधी याबाबतही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
‘मराठी तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढे येऊन सक्षम उद्योजक घडावे,’ हा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सिंधुदुर्गचा प्रमुख मानस असून, या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना उद्योजकतेची नवी दिशा मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा