You are currently viewing फोंडाघाटचे प्रसिद्ध व्यापारी शामसुंदर नारकर यांचे निधन

फोंडाघाटचे प्रसिद्ध व्यापारी शामसुंदर नारकर यांचे निधन

फोंडाघाटचे प्रसिद्ध व्यापारी शामसुंदर नारकर यांचे निधन

*फोंडाघाट बाजारपेठेतील विनोद स्टोअर व प्रसिद्ध ‘चंद्रराज लोणचे’चे मालक काळाच्या पडद्याआड*

फोंडाघाट :

फोंडाघाट येथील प्रसिद्ध व्यापारी व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व स्व. शामसुंदर नारकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने फोंडाघाटच्या व्यापारी व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
फोंडाघाट बाजारपेठेतील प्रसिद्ध विनोद स्टोअरचे ते मालक होते. तसेच ‘चंद्रराज लोणचे’ या प्रसिद्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मनमिळावू स्वभाव, मेहनती वृत्ती आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.
त्यांचे सुपुत्र श्री. दिनेश नारकर हे सध्या ‘चंद्रराज लोणचे’चा व्यवसाय तसेच बाजारपेठेतील दुकानाची जबाबदारी सांभाळत आहेत.
स्व. शामसुंदर नारकर यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवारी सकाळी ९ वाजता फोंडाघाट येथील निवासस्थानापासून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि नारकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. अजित नाडकर्णी व कुटुंबीय नारकर परिवाराच्या दुःखात सहभागी असून, स्व. शामसुंदर नारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा