You are currently viewing आनंद शिशुवाटिकेचा शुभेच्छा समारंभ संपन्न 

आनंद शिशुवाटिकेचा शुभेच्छा समारंभ संपन्न 

सावंतवाडी :

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या बालवाडीचा म्हणजेच आनंद शिशुवाटिकेचा बालवाडीतून इयत्ता पहिली मध्ये जाणाऱ्या मुलांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.

यावेळी शिशुवाटिकेच्या निपुण गटाच्या मुलांना बालवाडीतुन इयत्ता पहिली मध्ये जाताना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शिशुवाटिकेला दोन वायरलेस कॉलर माईक भेट स्वरूपात देण्यात आले.

सर्व शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी पालकांकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई यांनी मुलं आणि पालकांमध्ये मित्रत्वाचं नातं असणं योग्य ठरते असे प्रतिपादन केले. संस्था संचालक आणि पालक म्हणून अण्णा म्हापसेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालिका सौ. राजश्री टिपणीस, प्राजक्ता वेंगुर्लेकर, सुचिता वारंग, विभा पई, अनुष्का धाऊसकर, सौ. पांगम, दिव्यानी शिंदे तसेच पालक उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा