सावंतवाडीत पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; लॉजिंगमधील घटना
सावंतवाडी :
शहरातील साईकृपा लॉजिंगमध्ये वास्तव्यास असलेले नवी मुंबई-कोपर खैरणे येथील पर्यटक नोवेल अल्बर्ट डिसोजा (वय ७०) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, डिसोजा हे गेल्या चार दिवसांपासून संबंधित लॉजिंगमध्ये वास्तव्यास होते. रविवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सर्विसबॉय खोलीची साफसफाई करण्यासाठी गेला असता, डिसोजा यांच्या शरीराची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. यानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार सुरेश पाटील पुढील तपास करत आहेत.
