You are currently viewing डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात दि. १४ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीपर्यंत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी  https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8  या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांसाठी आपले आयुष्य समर्पित करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य केवळ एका निबंधात मांडणे शक्य नाही. त्यामुळे डॉबाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य महिला सक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर ही निबंध स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप–           

या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय,  खाजगी आयटीआय, तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तर विषयासाठी विद्यार्थ्यांना ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतात या गटाला ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे.

 स्पर्धेचा कालावधी दि.१४ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे. निबंध मराठी भाषेत लिहिणे अनिवार्य आहे.निबंध मूळ (Original) असावा, कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर शिष्ट आणि सुसंस्कृत असावा.निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल; मात्र अंतिम सादरीकरण PDF स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध स्कॅन करून दिलेल्या लिंकवर अपलोड करावा. स्पर्धकांनी पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, ITI/शाळा/महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता ही माहिती अवश्य लिहावी.

या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच उत्कृष्ट निबंधांना आकर्षक पारितोषिके (प्रत्येक गटासाठी): प्रथम क्रमांक: रु.31,000/- स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक: रु. 21,000/-, स्मृतिचिन्ह , सन्मानपत्र व  तृतीय क्रमांक: रु. 11,000/- + स्मृतिचिन्ह,  सन्मानपत्र अशी पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास विभागामार्फत दिली आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमांकाशी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या नोंदणीसाठी क्यू आर कोड ही देण्यात आला आहे. नोंदणी केल्यावर स्पर्धकांना त्याची पोच ही मिळणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य असून यासाठी सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लिंकवर भेट देऊन नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा. अधिक माहितीसाठी Sindhudurg Rojgar या Facebook आणि Whatsapp Channels किंवा  दूरध्वनी क्र. 02362-228835                ईमेल आयडी-sindhudurgrojgar@gmail.com    या संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा