*आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिर*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विभागातील नागरिकांच्या सेवेसाठी मोफत नेत्रतपासणी, चष्मा वाटप व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना शाखा क्र. २०७ आणि आरव आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांच्या नेत्रआरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि गरजूंना आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी महिला शाखा संघटक प्रियांका प्रदीप टेमकर यांनी सांभाळली. उपक्रमाला खासदार अरविंद सावंत, नगरसेवक रमाकांत रहाटे, पदाधिकारी विजय कामतेकर, हेमंत कदम, सुरेखा राऊत, चंदना साळुंखे, कीर्ती शिंदे, उषा पाटोळे, विजया वाळूज, स्वप्निल बागवे आणि मनीषा जाबरे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी शाखेतील आजी-माजी पुरुष व महिला पदाधिकारी, स्थानिक शिवसैनिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उपक्रमाचे स्वागत केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे शिबिर समाजोपयोगी उपक्रम म्हणून लक्षवेधी ठरले. नागरिकांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आणि नेत्रआरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उपस्थितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
