You are currently viewing हा देह नाशवंत

हा देह नाशवंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हा देह नाशवंत* 

 

जन्म झाला मोठा झाला

संसारी सुखे रमला

क्षणभंगुर सारेच इथे

हा हा म्हणता तो गेला।।

 

जे जे जन्मले ते गेले

क्षणभंगुर ही फुले

मातीतून वर आले

मातीत सारे निमाले।।

 

जीवन मृत्यू सगळे‌

काळावरचे हिंदोळे

रेतीची ही घड्याळे

परब्रह्म ते निराळे,।।

 

नाती जुळती क्षणात

विरती काळाच्या प्रवाहात

येणे-जाणे अटळ सत्य

हा देह नाशिवंत जीवनात ।।

 

शांत गूढ सरोवरी

उठती तरंग लहरी

क्षणभंगुर सारेच लागले

मन परतीच्या वाटेवरी।।

 

©️®️ डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा