You are currently viewing महाराष्ट्राचे लाडके लोकनेते,आमचे आराध्यदैवत व कोकणचे भाग्यविधाते आदरणीय नारायणराव राणे साहेबांचा आज वाढदिवस,,,,,,,,,

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते,आमचे आराध्यदैवत व कोकणचे भाग्यविधाते आदरणीय नारायणराव राणे साहेबांचा आज वाढदिवस,,,,,,,,,

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते,आमचे आराध्यदैवत व कोकणचे भाग्यविधाते आदरणीय नारायणराव राणे साहेबांचा आज वाढदिवस,,,,,,,,,

त्या काळातील कोकणातील कणकवली फळसेवाडी सारख्या दुर्गम भागातून भावी जीवनासाठी अनेक स्वप्ने घेऊन मुंबईत पाऊल ठेवलेला एक तरुण ते ह्या राज्याचे व देशातील कोकणचे सर्वोच्च नेते असा हॉलिवूड च्या चित्रपट कथेप्रमाणे एक झंझावती संघर्षमय जीवनप्रवास हि एक चित्तथरारक कहाणीच आहे,,,,,कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसतांना, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतांना व सामाजिक ओळख नसतांना, एका विशिष्ट ध्येयाने झपाटून, राजकीय क्षेत्रात पाऊल टाकुन, प्रचंड आत्मविश्वास, धडाडी, आणि कार्यक्षमतेच्या जोरावर कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या देशातील मोजक्याच नेत्यांच्या मध्ये मा. राणे साहेबांचा वरचा क्रमांक आहे,,,,,महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व,, बिनधास्त,, रोखठोक,, शब्दाला पक्का अशी ख्याती असलेले मा. राणे साहेब हे महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रिय नेते आहेत,,,, “एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि धमक माझ्यात आहे असे स्पष्ट मत त्यांचेच आहे “,,,,,,, म्हणुनच नगरसेवक,मंत्री,मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता ते केंद्रीय मंत्री वं पुन्हा लोकनियुक्त खासदार हा राजकीय प्रवास एका हॉलिवूड सिनेमा सारखा थरारक आहे,,,,,,, अर्थात ह्या प्रवासात, संघर्ष आहे,, जिद्द आहे,, त्याग आहे,, समर्पण आहे,, धडाडी आहे,, कार्यक्षमता आहे,, विश्वास आहे,, आणि निष्ठा आहे,, ह्या सर्व गुण वैशिष्ट्या मधुन मा. नारायणराव राणे साहेब नावाचं कुशल वं परिपूर्ण नेतृत्व उभं राहील आहे,,,,सदैव संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा मंत्र आहे,, ओठात तेच पोटात, आपल्याला राजकीय लाभ किती होईल याची पर्वा न करता जनहिता साठी स्पष्ट बोलणारा नेता,, आक्रमकपणा व स्पष्टवक्ते पणा हा तर साहेबांच्या स्वभावाचा अलंकार आहे,,,,!!!गेल्या 37 वर्षात कोकणी माणसाला स्वप्ने हि उघड्या डोळ्यांनी पाहायची असतात वं ती कोणत्याही परिस्थितीत सत्यात उतरवायची असतात हि सवयच मा. राणे साहेबांनी लावली,,,!!!
अत्यंत मागासलेला कोकण अशी असणारी कोकणची ओळख मा. राणे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पुसून टाकली, आणि संपूर्ण कोकण राज्याच्या विकासाच्या स्पर्धेत आणला,, मा. राणे साहेबांचा सत्ताकाळ हा सर्वसामान्य माणसाच्या उत्कर्षाचा काळ होता,, साहेबांनी नेहमीच सामान्य माणुस केंद्रस्थानी ठेऊन सत्ता राबवली वं विकासगंगा गावकुसा वरच्या कुटुंबाच्या दारात पोचवली,, आजची कोकणची किंबहुना सिंधुदुर्ग ची झपाट्याने झालेल्या प्रगती चे 100% यश हे राणेसाहेबांचे च आहे,,आजपर्यंत राणे कुटुंबियांनी हजारो संसार उभे केले, हजारो बेरोजगार तरुणांना नोकऱ्या दिल्या, कोकणातील गरीब विध्यार्थ्यांना स्वखर्चाने शिक्षण दिले, अनेक कुटुंबाना, अनाथाना दत्तक घेऊन निवारा दिला,, वृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम काढला,,गोरगरीब जनतेला उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणुन सुसज्ज अद्ययावत हॉस्पिटल उभे केले,, अनेक गरीब रुग्णांना मा. साहेबांनी मोफत रुग्णसेवा उपलब्ध करून दिली,,इंजिनिअरिंग कॉलेज काढले,, डेअरी कॉलेज काढले, महाराष्ट्रातील आधुनिक आणि सुसज्ज अशी गो शाळा काढली,, महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून महिला भवन काढून महिलांना रोजगार उपलब्ध केला,, आपल्या जिल्ह्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्या साठी जगातील ज्या ज्या लोकांभीमुख सुविधा असतील त्या त्या आपल्या लोकांसाठी निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मा. राणे साहेबांनी केला,,,,,म्हणुनच कोकणची जनता मा. साहेबांवर जीवापाड प्रेम करते,,सर्वसामान्य जनतेला साहेब हे नेते न वाटता आपल्या घरातील कर्ता पुरुष वाटत असतो त्यामुळेच सर्व अबालवृद्ध साहेबांना प्रेमाने “दादा ” म्हणतात,,,,,,,!!!आपल्या जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अभिमानास्पद असा पदवीदीक्षांत समारंभ झाला,,, मा. राणे साहेबांचे स्वप्न असलेल्या मेडिकल कॉलेज मधुन 4 एप्रिल रोजी MBBS ची 150 विद्यार्थ्यांची डॉक्टर होऊन पहिली तुकडी बाहेर पडली आपल्या देशातील आरोग्य यंत्रणेत 150 नवीन डॉक्टर ची भर पडली,,,,,,त्या ऐतिहासिक समारंभा साठी संपूर्ण राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा व विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता,, आणि त्याहीपेक्षा मा. राणे साहेब आणि सौं वहिनी साहेब ह्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपुर्ती चे समाधान ओसंडून वाहत होते, त्या ऐतिहासिक समारंभाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले,,,,,,,!!
आज साहेब कोकणचे खासदार आहेत नितेशजी च्या रूपाने एक चिरंजीव मंत्री आहेत,,, निलेशजी च्या रूपाने एक चिरंजीव आमदार आहेत,, नुसतेच आमदार व मंत्री नसून महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर प्रचंड प्रभाव पाडून आहेत,,,,, परमेश्वराने मा. साहेबाना व सौं वहिनी साहेबाना भरभरून दान दिले आहे,, ह्या देशातील हातांच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच नेत्यांच्या नशिबी असे भाग्य आहे,, इतके कर्तबगार सुपुत्र असणे,, चांगली गृहगृहस्थी असणे,, जीवाला जीव देणारे कार्यकर्ते व सहकारी लाभणे हे फक्त मा. साहेबांच्या नशिबात आहे,,,,,, देशपातळीवर काम करत असतांना साहेबांची सतत काळजी वाहणाऱ्या खंबीरपणे साथ देणाऱ्या सौभाग्यवती वहिनी साहेब यांचा त्याग व समर्पण हे सर्वात महत्वाचे आहे,,,,,,!!!! मा. साहेब जरी आक्रमक व करारी असले तरी तितकेच हळवे आहेत,, ज्याप्रमाणे फणसातील मधुर रसाळ गरे देखील त्याची चव घेतल्याशिवाय कळत नाहींत,!!!!! साहेब म्हणजे आकाश कवेत घेणारे नेते असुन त्यांच्या संपर्कात आले त्यांना आभाळाचे दान देत गेले,,,,,, ज्यांना ज्यांना मा. साहेबांचा परिसस्पर्श झाला त्याचे त्याचे आयुष्याचे सोने झाले,, सर्वसामान्य जनतेचे प्रेम हिच मा. साहेबांची शक्ती आहे, ह्या वयात सुद्धा रोज अठरा अठरा तास काम करत असतांना सर्वसामान्य कार्यकर्ता व जनतेची जातीनीशी काळजी घेणारा दुसरा नेता सापडणार नाहीं,,,, आमच्या सारख्या कार्यकर्त्याला नेहमीच मा. साहेबांचे मार्गदर्शन लाभते, साहेबांसारखा मनमोकळा नेता आम्ही आजवर पाहिला नाहीं,,, मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, आपल्या राजकीय जीवनातील पहिल्याच लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार प्रतिनिधी म्हणुन माझी निवड केली, एवढा मोठा विश्वास मा. साहेबांनी माझ्यावर टाकला, आणि निवडणुकीत साहेब मोठ्या मताधिक्याने निवडुन आले,,,,,!!!मला साहेबांचा सहवास व मार्गदर्शन नेहमीच लाभते, साहेबांच्या सहवासाने आम्हाला ऊर्जा व प्रेरणा मिळते,,,,,, आमची पूर्वपुण्याई असल्यामुळे मा. साहेबानं सारखा नेता आम्हाला लाभला,,!!
“अथांग कार्याला तेजोमय ध्यासाला वय हि मर्यादा थोडीच जखडुन ठेवणार “,,!!!!! साहेबांबद्दल लिहिण्यासाठी कागद कमी पडतील शाई संपेल असे हे कर्तृत्वान नेतृत्व!!!!,,,,,,
आजच्या ह्या शुभदिनी आदरणीय साहेबांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभुन त्यांच्या सर्व मनोकामना पुर्ण व्हाव्यात हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
शुभेच्छुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय
सावंतवाडी
सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा