*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*।।श्री स्वामी समर्थ काव्यवंदना ।।*
काव्यपुष्प- ६९ वे ।।
।।श्री स्वामी भ्रमणगाथा (सोलापूर ) …।।
__________________________
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
___________________________
चिंतोपंत टोळांच्या मनीचा भाव पाहुनी
ब्रह्माण्डनायक स्वामी येती पंत सदनी ।।
पंतांनी श्रीस्वामींचे यथासांग पूजन केले
तदनंतर त्यांनी स्वामींना नैवैद्य अर्पण केले ।।
मंदिरी येणारे पंत स्वामींच्या सेवेत रमले
स्वामींच्या सेवेत तत्पर -भक्त पंत शोभले ।।
मंदिरी तसे तर अनेक जण दर्शनास येती
यात चिंतोपंत टोळांसारखे विरळ असती ।।
अधूनमधून चिंतोपंत श्री स्वामींना नेती घरी
स्वामी देखील निवांतपणे इथे आराम करी ।।
स्वामी पंतांच्या घरात असता एक घडले
सोहोनी,पंतांचे एक स्नेही या घरात आले ।।
बोलणे झाले दोघांचे हळूच ते आपसात
कुठे ही जातात हे स्वामी,कुठेही खातात ।।
त्यांचे पान आपल्या सोबत ना मांडावे
ते एका बाजूला नि वेगळे असे मांडावे ।।
______________________
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
_________________________
कवी अरुणदास ” अरुण वि. देशपांडे-पुणे.
__________________________
