You are currently viewing कुडाळमध्ये भीषण अपघात टळला; जीप चढली दुभाजकावर

कुडाळमध्ये भीषण अपघात टळला; जीप चढली दुभाजकावर

कुडाळमध्ये भीषण अपघात टळला; जीप चढली दुभाजकावर

दोन लहान मुलांसह चौघे सुरक्षित

कुडाळ

कुडाळ कॉलेज चौक ते अभिमन्यू हॉटेल दरम्यान तहसीलदार कार्यालयाजवळील रस्त्यावर आज सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जात असलेल्या बोलेरो जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकावर चढले. त्यानंतर जीपची पुढील चाके समोरील लेनमध्ये उतरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

या अपघातात जीपमधील दोन लहान मुलांसह एकूण चार जण सुदैवाने थोडक्यात बचावले. मात्र, दुभाजकाचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा