You are currently viewing भेडशी – वीजघर मार्ग अपघात प्रकरणात आरोपी निर्दोष

भेडशी – वीजघर मार्ग अपघात प्रकरणात आरोपी निर्दोष

भेडशी – वीजघर मार्ग अपघात प्रकरणात आरोपी निर्दोष

अॅड. अशपाक शेख यांनी केला प्रभावी युक्तिवाद

दोडामार्ग तालुक्यातील भेडशी – वीजघर मार्गावर 17 सप्टेंबर 2024 रोजी घडलेल्या भीषण अपघात प्रकरणात ओरोस येथील जिल्हा न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. या अपघातात संतोष मधुकर शेटकर (वय 52 ) यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर आनामारी मिंगेल फोर्स (वय 51 ) या गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडल्या होत्या.
या प्रकरणी बोलेरो पिकअप चालक आदम हुसेन नाईकवाडी (वय 37, रा. साटेली-भेडशी) यांच्याविरोधात निष्काळजी व बेदरकार वाहनचालकत्वासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघात भेडशीकडून वीजघरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळणावर घडला होता. प्रकरणाचा तपास दोडामार्ग पोलीस ठाण्याने केला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने चार साक्षीदारांची तपासणी केली; मात्र आरोपीने निष्काळजीपणे वाहन चालवले असल्याचे ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आले. परिणामी, सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविण्यास नकार दिला.
आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. नामदेव मठकर, ॲड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, ॲड. कैस शेख, अॅड. भूषण कदम आणि ॲड. निकिता हरकुळकर यांनी सहकार्य केले.

ओरोस येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश – ०१ श्री. सूर्यकांत एस. इंदलकर यांनी 30 मार्च 2026 रोजी हा निकाल देत सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा