You are currently viewing फोंडाघाटात इंधन टँकर गटारात कलंडला

फोंडाघाटात इंधन टँकर गटारात कलंडला

फोंडाघाटात इंधन टँकर गटारात कलंडला; मोठा अनर्थ टळला

कणकवली

फोंडाघाटातील खिंडीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्गाच्या हद्दीत येणारा पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारा टँकर अचानक रस्त्यालगतच्या बांधलेल्या गटारात कलंडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. टँकरमध्ये प्रज्वलनशील इंधन असल्यामुळे मोठ्या आगीचा धोका निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतीचा पाण्याचा टँकर, जेसीबी व इतर आग प्रतिबंधक यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती.
महसूल आणि पोलीस विभागाने तात्काळ उपाययोजना करत, आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन अत्यंत दक्षतेने टँकर गटारातून बाहेर काढला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा